राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हळदी कुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद
वडगाव शहर राष्ट्रवादी महिला आघाडी व कुलस्वामिनी महिला मंचचे आयोजन
वडगाव मावळ:
वडगाव शहर राष्ट्रवादी महिला आघाडी व कुलस्वामिनी महिला मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभास सुमारे दोन हजार महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

येथील शासकीय विश्रामगृह आवारात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभाचा शुभारंभ कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके यांच्या हस्ते व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा दीपाली गराडे, जिल्हा कार्याध्यक्षा  सुवर्णा राऊत, क्रीडा सेल अध्यक्षा हर्षदा दुबे, नगरसेविका पूजा वहिले, शहराध्यक्षा पद्मावती ढोरे, कार्याध्यक्षा वैशाली ढोरे आदींच्या उपस्थितीत सरस्वती पूजन करून करण्यात आला.

याप्रसंगी चंदुकाका सराफ यांच्यातर्फे सोन्याची नथ आणि चांदीची नाणी लकी ड्रॉ च्या माध्यमातुन देण्यात आल्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणीत झाला, महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या, महिलांनी पारंपारिक उखाणे घेऊन कार्यक्रमाला रंगत आणली. आगामी काळात शहरातील महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे पद्मावती ढोरे व वैशाली ढोरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन आरती राऊत, करूणा पवार, अक्षदा ढोरे, वैशाली कुडे, भाग्यश्री विनोदे, रूपाली तुमकर, रूपाली खैरे, प्रियंका खैरे, निता देशमुख, मोहिनी खेंगरे, मोनिका
नवघणे, सविता दरेकर, सविता ढोरे, नंदा ढोरे, अनिता पाटील, सिद्धी सावले, उर्मिला काकडे, रेश्मा ढोरे, सुजाता घारे, जयश्री मालपोटे, विनया कडु, निकीता पगडे,सारिका कडु, सारिका शेजवळ, संध्या ढमाले आदी महिलांनी केले. पद्मावती ढोरे यांनी प्रास्ताविक केले, आरती राऊत यांनी सूत्रसंचालन केले तर भाग्यश्री विनोदे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!