पवना कृषक संस्थेवर सोरटे, शिंदे, दळवी, आडकर, जाधव, घारे या सहा प्रशासकीय सदस्यांची निवडख
पवनानगर :
पवना कृषक संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या परिवर्तनाची सुरुवात करा. राज्य सरकारकडून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्य शासन सामुहिक शेती गट स्थापन करून शेतकऱ्यांना आर्थिक सबल करत आहे. हेच काम या संस्थेच्या माध्यमातून करावयाचे आहे. यासाठी नवनिर्वाचित संचालकांनी या नविन आराखडा तयार करून संस्थेला व शेतकऱ्यांना पुन्हा उभे करा असे  आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी व ४० गावांतील शेतकऱ्यांची बाजारपेठ असलेली पवना कृषक ही संस्था आहे. १९७४ मध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेला ४७ वर्षे झाली असून या संस्थेवर प्रशासकीय सदस्य म्हणून गुरुवार (दि. २) रोजी सहा जणांची नियुक्ती करण्यात आली. या नवनियुक्त सदस्यांचा सत्कार माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सदर प्रशासकीय प्रशासकांमध्ये, विठ्ठल घारे, विश्वनाथ जाधव, शाम शिंदे , सिंधू दळवी, तानाजी आडकर, सूर्यकांत सोरटे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी राज्य मंत्री बाळा भेगडे, उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, लोहगड वि. सोसायटीचे चेअरमन गणेश धानिवले, महागाव चांदखेड गट अध्यक्ष माऊली आडकर, महागाव गण अध्यक्ष नारायण बोडके, ज्ञानेश्वर ठाकर, गणेश कल्हटकर, बबन कालेकर, संदीप भुताडा, अंकुश पडवळ, सचिन मोहिते, शत्रुघ्न धनवे, गणेश ठाकर, सरपंच प्रमोद दळवी, सरपंच रोहन जगताप, आत्माराम आडकर, हिरामण नढे, रामचंद्र ठाकर, बाळासाहेब भोंडवे, सरपंच वसंत मस्कर, वसंत सोनवणे, प्रकाश ठाकर, यांच्या सह पवन मावळ मधील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब जाधव व आभार विठ्ठल घारे यांनी मानले.

error: Content is protected !!