आजचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा देणारा : माजी राज्यमंत्री  बाळा भेगडे
पुणे :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर दिला आहे. रोजगार निर्मिती लक्षात घेऊन सरकारने भांडवली खर्चात वाढ केली आहे.आजचा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने देशाला नवी दिशा देणार अर्थसंकल्प होय असा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

या अर्थसंकल्पात सर्वच आर्थिक बाजूचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडला गेला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा समतोल राखत हा अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे त्यामुळे आजचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशेला देणारा ठरणार आहे असे ही राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे म्हणाले.

You missed

error: Content is protected !!