पौड:
  मुळशी तालुक्यातील काशिग गावचे सुपुत्र धनंजय टेमघरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुळशी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मुंबई येथील शिवतीर्थ या राजसाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
 
त्याप्रसंगी मनसे चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा संतोष आप्पा दसवडकर, वेल्हा तालुका अध्यक्ष मा दिगंबर चोरघे, भोर ता अध्यक्ष दीपक पांगारे,मुळशी ता माजी अध्यक्ष मा गणेश जोरी, सागर खंडाळे, कोंडीबा साठे व तीनही तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धनंजय टेमघरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षाचे निष्ठावंत मनसैनिक म्हणून ओळखले जातात यापूर्वी त्यांना मुळशी तालुका मनसे सरचिटणीस, पुणे जिल्हा मनविसे सचिव अशी संघटनेची विविध पदांवर त्यांनी काम केले आहे त्यामुळे मुळशी तालुक्यातील युवकांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे.

निवडीनंतर बोलताना धनंजय टेमघरे म्हणाले “,पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून संघटना वाढीसाठी भविष्यात प्रयत्न केले जातील.व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याचा प्रयत्न असणार आहे.

error: Content is protected !!