टाकवे बुद्रुक :
आंदर मावळ व नाणे मावळ मध्ये अखंड हरिनाम सप्ताह गजर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक अखंड हरिनाम सप्ताह मंडळांनी टाकवे गावचे माजी उपसरपंच व टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास राघुजी असवले  यांच्याकडे पंगतीसाठी व जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी याची मागणी केली असता त्यांनी अनेक मंडळांना भांडी पुरवण्याचे काम केले.

त्या अनुषंगाने आंदर मावळ मधील माळेगाव खुर्द येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने जेवण बनवण्यासाठी व पंगतीसाठी लागणाऱ्या भांड्यांची मागणी केली असता  तेथील ग्रामस्थांची मागणी पूर्ण करत उपसरपंच रोहिदास नाना असवले यांनी त्यांना जेवण बनवण्यासाठी व पंगतीसाठी लागणारी भांडी सुपूर्त केली आहेत.  माळेगाव खुर्द येथे सालाबाद प्रमाणे 20 व्या वर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

त्या निमित्त काल्याच्या  दिवशी कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली. या वेळी ह भ प राघव बाबा चैतन्य महाराज यांचा  सत्कार टाकवे गावचे माजी उपसरपंच रोहिदासनाना  असवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी माजी उपसरपंच रोहिदास असवले यांचा व त्यांच्या मित्र परिवाराचा सत्कार माळेगाव खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.आयोजक समस्त ग्रामस्थ  माळेगाव खुर्द कार्यक्रमाचे नियोजन गावातील सर्व माता पिता बंधू भगिनी सर्व लहान आबाल वृद्ध यांनी केले होते .

तर कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप ज्येष्ठ नेते बंडोबा असवले, तुकाराम कोद्रे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मावळ तालुका अध्यक्ष बबन ओव्हाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जांभुळकर, रवींद्र आंद्रे,अध्यक्ष रवी कुटे, टाकवे शहर अध्यक्ष दत्तात्रय असवले,अध्यक्ष काळूराम घोजगे,काशिनाथ जांभुळकर,संतोष कोंडे, सोमनाथ असवले,  शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वाऊड संतोष मोकाशी,चिकू उर्फ बाळासाहेब वायकर,भगवान लोंढे,संजू जगताप,मुन्नावर आत्तार,चेतन लोंढे उपस्थित होते.

गावातील मान्यवर माजी सभापती शंकर सुपे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आंदर मावळ अध्यक्ष बाळासाहेब घाडगे,पोलीस पाटील जालिंदर मेटल,किसन सुपे, गबळू  लांगे, अंकुश वासावे, अरुण मोरमरे  यांसह गावातील बंधू भगिनी,  माता पिता लहान थोर  बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!