तळेगाव दाभाडे :
मराठी माणूस तीन फडात रमतो,मी मात्र शब्दाच्या फडात रमलो. बालपणापासून माझं शब्दाचं गु-हाळ चालूच आहे. पानिपत  रेल्वे च्या डब्यात  बसून  लिहिले,हे लिहिताना मला रेल्वे रूळाचा नव्हे तर घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता,असा अनुभव ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी सांगितला.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफताना पाटील बोलत होते. पानिपतकार ही ओळख याच पुस्तकाने करून दिली असे सांगून पाटील म्हणाले,”
तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी १९९२ च्या सुमारास पानिपत हिंदीत आणले.पानिपतला जाऊन संशोधन केले,ते लेखणीत उतरले.आज १४जानेवारी ला दीड लाख मराठे पानिपत जाऊन आपल्या वीरांना मानवंदना देतात हा लेखणीचा विजय आहे. मराठी वाचकांना एका केसा इतकीही चूक सहन होत नाही.

इंद्रायणी महाविद्यालयातच्या प्रांगणात विद्यार्थी,शिक्षक,पालक,पदाधिकारी पाटील यांच्या व्याख्यानात मंत्रमुग्ध होऊन गेले होते,पाटील एक एक  दाखला देत शिवरायांचा इतिहास उलगडत होते.पाटील म्हणाले,”४९ वर्षाचे आयुष्य छत्रपती शिवरायांना लाभले. अधिक दहा वर्षाचे आयुष्य माझ्या छत्रपती शिवरायांना मिळाले असते तर मराठ्यांनी पॅरिस ला धडक मारली असती. युगपुरुष शहाजीराजे भोसले यांना भुलेश्वरच्या डोंगरावर राजधानी बांधायची होती. १६२४ ला भातवडीच्या युद्धात गनिमी कावा युद्धाचा जन्म झाला. पराभूत होऊन मोठया भावाला तोंड दाखवणे मराठ्यांच्या रक्तात नाही,शरफजी राजे भोसले हे मराठ्यांचे पहिले शहीद झालेले वीर पुरुष होते. हरहर महादेव हा पहिला मंत्र मराठ्यांना मिळाला.

पाटील पुढे सांगत होते,”छत्रपती शिवरायांजवळ भवानी तलवारीपेक्षा ही मोठी अशी बुद्धीची तलवार होती. त्या बळावर त्यांनी बलाढ्य शुत्रवर  यशस्वीपणे मात केली.शहाजी राजे भोसले यांनी राजमुद्रा लिहिली. दक्षिण हिंदुस्थानात शहाजी राजे भोसले यांची राजधानी होती. शहाजी राजांनी आपल्या चारही पुत्रांना लष्करी शिक्षण दिली होते. याच शिक्षणाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य उभ राहिले.

error: Content is protected !!