संकटांचा सामना करण आपल्या हातात असतं कसं ते पाहू या!
मित्रांनो ,’ जगताना आत्मविश्वास आणि साहस खूप महत्वाची असतात आणि आपल्या जीवन प्रवासात दोन्ही गोष्टी आपल्याला देणारी माणसं आपल्या सोबत असतील तर तुम्ही तुमचं ध्येय निश्चित गाठू शकता.

कारण, मित्रांनो छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण माणसाला पावसाळ्यात थांबवण्याचे धाडस मात्र नक्की देऊ शकते!– जसं केवळ आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची ताकद नक्की देऊ शकतो!- म्हणून मित्रांनो जीवनाच्या वाटेवर आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटाला घाबरून पळू नका .

कारण संकटं टाळणं माणसाच्या हातात कधीच नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात निश्चित असत!– असं म्हणतात की *जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे आणि जर या पाण्याला समुद्र गाठायचा असेल तर समोर येणाऱ्या मार्गावरील खाच-खळगे पार करावेच लागतील हे शाश्वत सत्य आहे.

–मित्रांनो शेवटी स्वतःला जिंकायचं असल्यास आपल्या बुद्धिचा वापर करा आणि इतरांना जिंकायचं असेल तर त्यांच्या भावनांचा आदर करा.मित्रांनो इतरांना वाटत असेल की तुम्ही शून्य आहात तर त्यांना जाऊन सांगा की शून्याला ही किंमत असते फक्त त्यांच्यापुढे उभे राहण्याची त्यांच्याकडून परवानगी मागा आणि आपली प्रगती साधा!

मित्रांनो जीवनात शेवटी काय होईल ही भीती का बाळगायची किंबहुना या सतत भीतीच्या छायेतच का जगायचं?– प्रत्येक वेळी आपलं वाईटच होईल हा नकारात्मक विचार का करायचा?- मनाशी एक मात्र खूणगाठ बांधली पाहिजे की मला माझं ध्येय गाठण्यासाठी मला चालत राहिलं पाहिजे.

कारण शेवटी मला काहीच मिळालं नाही तरी निदान अनुभव तर मिळेल ना!- जो माझ्या अंतिम यशाचा वाटाड्या असेल!

(शब्दांकन-ला. डॉ. शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!