कामशेत:
पाली तीर्थ यात्रा कमिटी च्या वतीने इंद्रायणी नदी ची स्वच्छता आणि संवर्धन या साठी कामशेत शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातील सुमारे १०० महिला व युवक या रॅली मध्ये सहभागी झाले होते.

रॅली नंतर वडीवळे येथील संगमेश्वर तीर्थक्षेत्रे जाऊन त्या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणात इंद्रायणी तिरावर ह.भ.प. गणेश महाराज जांभळे यांनी नदी चे अध्यात्मिक महत्व सांगीतले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे माजी अध्यक्ष सचिन काळभोर यांनी नदी विषयीची सविस्तर माहीती देत आपण ती कशी स्वच्छ ठेऊ शकतो महिलांची त्या बाबतची भूमिका कशी असावी असे स्पष्ट केले.

एक महिला जलसाक्षर झाली तर संपूर्ण कुटुंब जल साक्षर होईल हा आशावाद व्यक्त केला आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शन पर भाषणात काळभोर यांनी नदी स्वच्छता व संवर्धन या बाबत लहान सहान पण महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या.त्या नंतर नदी बाबतची कृतज्ञता व्यक्त करताना खना नारळाने ओटी भरून दिवे अर्पण करण्यात आले आरती केली व नदी स्वच्छेतेची प्रतीज्ञा यावेळी घेण्यात आली.

पोपट बाफना,राजेश गायकवाड, यांच्या संकल्पनेतून ही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमासाठी भोजन व्यवस्था संघवी अशोक मोडालाल गदिया यांनी केली होती.या वेळी राजू बेदमुथ्था,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे,संपर्क प्रमुख लासूरकर,दत्ताशेठ रावते,प्रवीण पवार,बाळासाहेब दुबे, विनायक वाघवले ,ॠतुध्वज घोलप,गोविंद कदम,सुनील गायकवाड, संजय गरूड,बेबी बाफना,माजी सरपंच सारिका घोलप,मिना बालगुडे,प्रभा दाभाडे,संगीता वाघवले,कविता मावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!