अन क्षणातच  गाडीचे ब्रेक दाबले
सेवेची जननी!{ भाग क्रमांक – २ }

मित्रांनो ,कराड इस्लामपूर रस्त्यावर घडलेला एक प्रसंग ..
मे महिन्याचे दिवस होते ,
भर दुपारी बारा वाजण्याची वेळ होती. रणरणतं ऊन होतं ,जीवाची लाही लाही होत होती ,
अशावेळी एक मोटरसायकलवर एक जोडपं ,इस्लामपूर च्या दिशेने सत्तर-ऐंशीच्या स्पीडने जात होतं. मोटरसायकलवर मागे बसलेल्या जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या त्या भगिनी चा आवाज ऐकल्यानंतर रस्त्यावरील लोकसुद्धा थांबून त्या मोटरसायकल वाल्याला रस्ता करून देत होते.

साधारण इस्लामपूर शहर 5 सहा किलोमीटर लांब असेल अशा अंतरावरती एक पेट्रोल पंप होता.मोटरसायकल वाल्याने आपल्या पत्नीच्या विनंतीवरून पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या चहाच्या टपरीजवळ आपली गाडी उभी केली आणि आपल्या पत्नीला टपरीच्या एका खुर्चीवर कसं बसवलं त्याच्या पत्नीच्या प्रसववेदना अति झाल्यामुळे ती ओरडायला लागली
तो आवाज ऐकून टपरीवर चार-पाच ग्राहकांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि क्षणार्धात तिच्या ओरडण्याच कारण हि त्यांना समजलं आणि ते कारण म्हणजे प्रसव वेदना की ज्या तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होत्या!–

तिचा नवरा मदतीसाठी इस्लामपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर हात करून उभा राहिला. तो प्रत्येक वाहनाला थांबण्या करता हात वर करून प्रयत्न करायचा पण जवळ जवळ अर्धा तास झाला तो त्याचा प्रयत्न वाहन थांबवण्यास फलद्रूप झाला नाही. वाहनांच्या ड्रायव्हरचे लक्ष केंद्रित करण्यासाठी तो आपल्या पत्नीकडे बोट दाखवून इशारा सुद्धा करीत राहिला पण कोणीही थांबायला तयार नव्हतं आणि इकडे पत्नीच्या प्रसव वेदना अधिकच वाढत होत्या.

टपरीवर बसलेल्या दोन-तीन गिऱ्हाईक यांपैकी एक वीस-बावीस वर्षांचा तरुण त्याच्या हातात असलेल्या गोल्ड स्पॉट चा आनंद घेत होता. या भगीनीच्या नवऱ्याची ही धडपड तो बराच वेळ बघत असताना त्याने एक निर्णय घेतला आणि तो त्याच्या मदतीला धावून रस्त्यावरील वाहने उभी करण्याच्या त्याच्या बरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हाताने विनंती करू लागला ,परंतु त्यालाही कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. मग मात्र त्याची सहनशक्ती संपली आणि त्याने समोरून येणाऱ्या एका सुमो गाडीवर आपल्या हातातील ती गोल्ड स्पॉट ची काचेची बाटली नेम धरून समोरच्या काचेवर मारली आणि क्षणार्धात खळकन फुटण्याचा आवाज आला आणि मित्रांनो त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.

काही क्षणातच खाडकन गाडीचे ब्रेक दाबले गेले आणि गाडी थांबली गाडी थांबल्याबरोबर गाडीतील चार टग्या प्रवाशांनी गाडीतून उतरून त्या तरुणाला मारायला सुरुवात केली हे दृश्य पाहून गर्दी जमली गोंधळ सुरू झाला. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर थांबली ज्यात एक रिक्षाही थांबली!–रिक्षा थांबल्याबरोबर त्यात त्यांचा मार सहन करीत असलेल्या तरुणाने रिक्षावाला हाताच्या इशाऱ्याने प्रसव वेदनेने तळमळत असणाऱ्या त्या महिलेकडे त्याला पाठविले.

त्यानेही चटकन त्या भगिनीला आणि तिच्या नवऱ्याला रिक्षात बसून इस्लामपूर कडे रिक्षा पळवली आणि मग मात्र रस्त्यावरील त्या घोळक्यात तील लोकांच्या लक्षात सर्व खरा प्रकार आला!–हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर जिज्ञासेने डोक्यातील एका तरुणाने त्याला प्रश्न विचारला की!– ही बाई तुझी कोण होती आणि तु असे का केले?–
मित्रांनो त्याने त्यावर फार मार्मिक उत्तर दिलं ,तो म्हणाला की ,”मी तिला तिचं नाव विचारलं नाही, तिचं गाव किंवा जात विचारली नाही फक्त मी एकच विचार केला ,मित्रांनो की तिच्या जागी जर माझी बहीण असती तर मी काय केलं असतं आणि त्यामुळेच हे माझ्या हातून घडलं!-

-मित्रांनो आपल्या अंतःकरणातील
करुणे तून कृती चा जन्म होत असतो हे निश्चित आहे ही घटना पाहणारे अनेक होते .त्यांच्याजवळ फक्त सहानुभूती होती पण कृती नव्हती म्हणूनच मित्रांनो ज्यावेळी सहानुभूती ला कृतीची जोड मिळते त्यावेळीच तिचं रूपांतर सह अनुभूतीत होतं!–
चला तर मित्रांनो पुन्हा असेच काही प्रसंग पाहू या या पुढच्या भागात.
(शब्दांकन- डाॅ. शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!