चारित्र्य  आरसा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग – १
      मित्रांनो इंग्रजीत एक म्हण आहे
      ” When wealth is lost,
        Nothing is lost
       When health is lost
        something is lost
        But
     When character is lost
    everything is lost”.
    Character ,      
         
म्हणजे चारित्र्य ह्याला एवढं महत्त्व आहे का हो?
     की हे गेल्यावर सगळंच काही जात, मागे काहीच उरत नाही .  मग हे चरित्र चारित्र्य म्हणजे नक्की काय?
       याचा मी माझ्या परीने शोध घेण्याचा प्रयत्न केला.
      उत्तर असं आलं की जो सामाजिक बंधने, संयमाने, नीतिमत्तेने,नियमानुसार पाळतो, आपल्या कृतीतून व्यक्त करतो, कळत नकळत का होईना कोणाचाही आत्मा दुखवत नाही सर्वांचे नेहमी कल्याण होवो असे चिंतन नव्हे तसा प्रयत्नही करतो.
     
ज्याच्या हृदयामध्ये करुणा असते, दुसऱ्यांविषयी प्रेम ,आदरभाव असतो ,दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता असते ,जो रागावर विजय मिळवतो या सर्व सद्गुणांचा समुच्चय ज्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनुरेणूतून ओतप्रोत भरलेला त्याला सत्शील चरित्र (character) असं म्हणता येईल .
      याउलट त्याच्यावरील कोणताही गुण नसतो ,जो प्रत्येक व्यवहार  अनैतिकतेने करतो, शीघ्रकोपी असतो, सामाजिक नियम पायदळी तुडवतो, त्या व्यक्तीला चारित्र्यहीन(characterless)  असे संबोधले जात.
     
       पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी कल्पना विलासांचा उच्चांक गाठत असताना सच्शील चारित्र्याचे उत्तम वर्णन केले आहे ते म्हणतात ,
      “चंद्रमे जे अलांछन
       मार्तण्ड जे तापहीन ,
       ते सर्वही सदा सज्जन
       सोयरे होतु “.
       म्हणजे डाग नसलेला चंद्र जो अस्तित्वात नाही, पण अपेक्षित आहे आणि ताप नसलेला ,आग ओकणारा सूर्य अस्तित्वात नाही पण अपेक्षित आहे, याला उत्तम चारित्र्याची उपमा त्यांनी दिली आहे .
     असे उत्तम चारित्र्यसंपन्न मला होता येईल का ?
     होय !
      थोडा प्रयत्न केला तर निश्चितच असं चारित्र्य संपादन करण्यासाठी मी यशस्वी होईन .
     
       मी माझ्यात वसत असलेल्या अपप्रवृत्तीवरती मात केली ,संयमावर आरुढ झालो, नीतिमूल्यांचा अभ्यास करून ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला ,तर ते मला नव्हे प्रत्येकाला सहज प्राप्त होईल.या अपेक्षित कृतीची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करता येईल .
      विद्यापीठाच्या कुलगुरू ची निवड करायची होती . निवड समितीसमोर आणि  अर्ज आले.
     
     कुलगुरू ची निवड करताना त्यांनी तीन निकष ठरवले ,
   याचे ज्ञान किती आहे?
    याचा अनुभव किती आहे ?
     याचे चारित्र्य कसे आहे?
    पहिला प्रश्न ज्ञान –त्याने आपल्या अर्जासोबत जोडलेल्या त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावरून त्याची ज्ञान परीक्षा होते .
दुसरा प्रश्न अनुभव– महाविद्यालयात प्राचार्य पद त्यांनी भूषविले असेल, तिथले व्यवस्थापन, तिथली शिस्त त्याने उत्तम प्रकारे पाळली असेल तर तिथे त्याचा अनुभव सिद्ध होईल.

    तिसरा प्रश्न म्हणजे त्याचं character, त्याचं चारित्र्यही उत्तम आहे हे कसे ठरवणार?
     निवड समितीला हा प्रश्न पडला त्यातील एक चाणाक्ष सभासद म्हणाले की त्या संदर्भात त्याचं वागणं-बोलणं हे तर बघणार आहेतच पण ……
       त्याला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तो असा की ,
    “तुमचे आई-वडील कुठे असतात ?”
      त्याने जर उत्तर दिलं मी इथे एकटा आहे ,माझे आई-वडील गावी असतात किंवा ,ते माझ्याजवळ असतात या
उत्तरापैकी पहिले उत्तर
त्याच्या चारित्र्याला घातक आहे, कारण जो  प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्या आई वडीलांना सांभाळू शकत नाही ,तो ही विद्यापीठातील मुलं कशी सांभाळणार !
( शब्दांकन- डाॅ. शाळिग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!