कान्हे:
मावळ तालुक्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर व “जागरुक पालक सुदृढ बालक” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक आरोग्य सेवा, मंडळ पुणे, डॉ.नागनाथ यमपल्ले जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे व डॉ. भगवान पवार जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

तालुकास्तरीय आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर मायमर वैद्यकीय महाविद्यालय, गरवारे रक्तपेढी मार्फत ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ येथे  घेण्यात आला. तर जागरूक पालक सुदृढ बालक या कार्यक्रमाचे तालुकास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद शाळा कान्हे येथे घेण्यात आला.

डॉ. जयश्री ढवळे  वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ ,डॉ. चंद्रकांत लोहारे  तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती वडगाव मावळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी संजय ऊर्फ बाळा भेगडे (माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य), गुलाबराव म्हाळसकर( माजी सभापती पंचायत समिती वडगाव मावळ), विजय सातकर( सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कान्हे), किशोर सातकर(उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कान्हे) यांच्यासह अन्य पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!