टाकवे बुद्रुक:
पुणे जिल्हा परिषद तसेच मावळ पंचायत समिती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना डाहुली श्रेणी 2 तर्फे निळशी या गावामध्ये जनावरांचे लसीकरण जंत निर्मूलन तसेच गोचीड गोमाशी निर्मूलन शिबिर आयोजित केले होते.

हा महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभागाचा अतिशय सुंदर उपक्रम राबविण्यात आला.गोपालक /शेतकरी उपस्थित होते. जनावरांचे आरोग्य,गोठा स्वच्छता, गोचीड, गोमाशी निर्मूलन, जंत निर्मूलन याचे मार्गदर्शन करण्यात आले.

लसीकरणाचे महत्व सांगून  डॉ.सचिन आरोटे तसेच परिचर तुकाराम गवारी यांनी औषधे वाटप केले.शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ.सचिन आरोटे यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!