संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो: गणेश महाराज जांभळे
टाकवे बुद्रुक: प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व.दिलीपभाऊ टाटीया यांची पुण्यतिथीनिमित्त वरसुबाई माध्यमिक  विद्यालयात व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य असे व्याख्यान झाले .

जांभळे यांनी आपल्या व्याखानाच्या माध्यमातून बोलताना विद्यार्थी व समाजाला उपदेश करीत असताना संस्कारक्षम माणूस हा संगती मधून घडत असतो म्हणून चांगले आचरण असलेल्या मित्रांच्या,लोकांच्या संगतीत रहावे.आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे.टाकी चे घाव सोसल्या शिवाय दगडाला पण देव पण येत नाही. तुम्ही आम्ही तर माणूस आहोत प्रयत्ना शिवाय काहीही मिळणार नाही म्हणून प्रयत्नशील रहा असे मत व्यक्त केले.

यावेळी सर्व प्रथम स्व.दिलीपभाऊ टाटीया यांचे प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते हार घालून पूजन करण्यात आले. या वेळी माजी सभापती शंकरराव सुपे,,राजूशेठ बेदमुथ्था,दशरथ दगडे,गबळू लांघी,केद्रप्रमूख मधूकर गंभीरे,शितल दंडवते,शिवकांता गिते,आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ ,पालक उपस्थित होते प्रवचना नंतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद चे नियोजन करण्यात आले होते..

मान्यवर पाहुणे,ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी दिलीपभाऊंविषयी च्या आपल्या भावना व्यक्त केल्या.भाऊंचे विचार महान होते म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेऊन माळेगाव सारख्या आदिवाशी दुर्गम भागात शाळा सुरू केली म्हणून आज येथील मुलं मुली दहावी पर्यंतचे मोफत आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण इथे घेत आहेत.हा वारसा पुढे सदैव चालत राहील असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

संस्थेचे सचिव पोपट बाफना हे आता सक्षम पणे ही संस्था चालवीत आहेत हेच शैक्षणिक कार्य  भाऊंसाठी खरी श्रद्धांजली ठरेल असेही गायकवाड आपल्या मनोगतात बोलले.यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी आपले विचार व्यक्त केले व भाऊंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी केले सुत्र संचलन नामदेव गाभणे यांनी केले तर आभार राजेंद्र भांड यांनी मानले संतोष बारसकर,तुषार पवार, सुनिल गायकवाड, अशोक सुपे,बाळासाहेब गायकवाड, रघूनाथ सातकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!