तळेगाव स्टेशन:
प्राचीन भारतीय संस्कृतीचे नंदनवन फुलवुन अखंडपणे वाहत रहावे यासाठी चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE), इंदोरी येथे श्रीमदभगवत गीतेचे वाटप करण्यात आले. इंडो-युरोपीय भाषाकुलामध्ये ‘संस्कृत’ भाषा गणली जाते. भारतीय परंपरेने या भाषेला देववाणी, गीर्वाणवाणी, सुरवाणी असे म्हणून देवत्व बहाल केले.

आयुष्यातील प्रत्येक अंगाचा – उपांगांचा विचार करणारे ज्ञानधन या भाषेत आहे. आज ‘ग्लोबल व्हिलेजी’करणाच्या प्रपातात भारताला टिकून राहण्यासाठी गरज आहे ती प्रत्येकाने संस्कृत शिकण्याची!या भाषेतील व्याकरणाच्या अध्ययनाने   तार्किक विचारसरणी निर्माण होण्यास मदत होते.

शास्त्रीय ग्रंथ वाचून त्याबद्दल अधिक संशोधन, लिखाण करण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे वप्राचीन काळापासून ते आजतागायत प्रसवलेली ही संस्कृत मंदाकिनी  आपल्यात सामावून घेण्यासाठी  चैतन्य इंटरनॅशनल स्कूल प्रयत्न करत आहे.विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा व  ही भाषा  आत्मसाद करावी  या उद्देशाने शाळेत संस्कृत हा विषय शिकवला जातो.

भागवत एकादशी या दिवसाचे अवचित्त  साधून शाळेत श्रीमद्भगवद्गीता चे पूजन करून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात  आले.   विद्यार्थ्यांना भगवत गीतेचे वाचन  शिकवून त्यातला  सार समजून सांगितला जातो.  श्रीमद्भगवद्गीते सांगितलेला उपदेश समजून घेऊन त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल व्हावा हा शाळेचा मानस आहे.

याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान  शेवकर हे उपस्थित होते. सर्वांनी श्रीमद् भगवद्गीता मुखद्दवत करावी असे आवाहनही त्यांनी सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांना केले . सर्व मुलांनी श्रीमद्भगवद्गीता  पाठांतर करून त्यातील ज्ञान संपादन करावे  तसंच आपल्या  पालकांना सुद्धा त्याच्यात समाविष्ट करावे असे  मुलांना आवाहनही केले.

शाळेतर्फे पालकांना सुद्धा संस्कृत भाषा शिकवण्याची तयारी  पण शालेय व्यवस्थापन समितीने  दर्शवली. वर्गशिक्षकांच्या  हस्ते  सर्व विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीतेचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व  शालेय कर्मचाऱ्यांना सुद्धा शालेय समितीतर्फे याचे वाटप करण्यात आले.   श्रीमद्भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायाचे पठण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!