शासकीय चित्रकला परीक्षेत ग्रामीण भागातील पवना विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांचे यश
पवनानगर
येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या पवना विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

एलिमेंटरी परीक्षेला ३१विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील ए श्रेणीमध्ये ०४ विद्यार्थी, बी श्रेणीमध्ये ०६ विद्यार्थी व सी श्रेणीमध्ये २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. तर इंटरमिजीएट परीक्षेला १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

बी श्रेणीमध्ये ०५ विद्यार्थी व सी श्रेणीमध्ये ०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
कला शिक्षक श्री अमोल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री संतोष ठाकर, श्री दिनेश काळे, श्री मनोज गराडे, ऐश्वर्या बुटाला यांनी सहकार्य केले. शालेय समितीचे अध्यक्ष श्री संतोषजी खांडगे, मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब आगळमे,पर्यवेक्षिका सौ निला केसकर, शिक्षक प्रतिनिधी श्री गणपत ठोंबरे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री दिनेश काळे, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!