राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या गणेश बोऱ्हाडेला सुवर्ण पदक
तळेगाव स्टेशन:
इंद्रायणी महाविद्यालयाचा खेळाडू गणेश मंगेश बोऱ्हाडे याने सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १९  वर्ष वयोगटामध्ये ७३ किलो खालील वजनी गटात एकूण २२७ किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक मिळविले. त्याच्या या यशाचे कौतुक होते. मंगेश आंदर मावळातील टाकवे बुद्रुकचा खेळाडू आहे.

जिल्हा क्रिडा संकुल सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचा इयत्ता अकरावी मधील खेळाडू गणेश मंगेश बोऱ्हाडे याने १९  वर्ष वयोगटामध्ये ७३ किलो खालील वजनी गटात सहभाग घेतला. त्याने स्नॅच ९७किलो व क्लीन अँड जर्क १३० किलो असे एकूण २२७ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक) मिळविला.

या सुवर्णमय यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, संस्थेचे विश्वस्त मंडळ, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. ए. आर. जाधव, शारीरिक शिक्षण संचालिका प्रतिभा गाडेकर व मार्गदर्शक बिहारीलाल दुबे, नितीन म्हाळसकर  यांनी त्याचे विशेष कौतुक केले.

You missed

error: Content is protected !!