वडगाव मावळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या’  परिक्षा पे चर्चा ‘पर्व सहा या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत मावळ तालुक्यातील २८०५ विद्यार्थी सहभागी झाले.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड,मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे,केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भांगरे यांनी विशेष मेहनत घेतली.

यामुळे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तालुका स्थरावर चार केंद्रावर मुख्याध्यापक प्रतीभा चौधरी,उद्धव होळकर,अमोल साळवे,अंजली गणू व मुख्याध्यापक संघाचे पदाधीकारी यांचे नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडली तर ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या.

स्वच्छ भारत अभियान,बेटी बचाव बेटी पढाव,आझादी का अमृत महोत्सव,आत्मनिर्भर भारत, सर्जिकल स्ट्राईक या सारखे अनेक विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. स्पर्धेत कु.पुजा महादेव भालशंकर रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन,तळेगाव दाभाडे हीचा प्रथम क्रमांक आला. चि.वेदांत महेश जगताप भोंडे हायस्कूल द्वितीय तर ऋतुजा रूपेश गोडशे आण्णा साहेब चोभे हायस्कूल त.दा. तृतीय क्रमांक आला .

इतर उत्तेजनार्थ पारितोषिक प्राची म्हस्के,रोहीत विश्वकर्मा,शिवानी टेमगिरे,भावेश तुमकर,जान्हवी शेलार,निशा राजे,श्रेया फाले,सोहम दळवी,उन्नती जगताप,साक्षी भागीत,तनुजा कमाने,अर्पीता कुलकर्णी,शरन्या केंगार,समृद्धी अडाळगे,ओजस्वी छाजेड,सत्यम राय,सुप्रिया कांबळे,हर्शदा दळवी,चंद्रकला हेलवर, श्रावणी वाजे,आयुश बुटाला, शबनम शहा,रागीनी नाईक, आयुष जव्हेरी,ग्रीश्मा भांगरे या  स्पर्धकांना देण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण मावळ तालुका कलाध्यापक संघाचे कला अध्यापक श्री. महेश चोणगे, श्री. श्रीहरी तनपुरे, श्री. संजीव जाधव,श्री.अमोल जाधव, सौ. अरुंधती देशमाने, श्रीम. अमृता परदेशी,  श्री. विजय वरघडे, श्री. योगेश कोठावदे,श्रीम. श्रद्धा क्षीरसागर, श्रीम. गायकवाड पी. बी., सौ. भिरूड मॅडम, सौ.सलमा मुल्ला यांनी केले.केंद्रप्रमुख मिनिनाथ खुरसुले,शिवाजी जरग,अजित नवले,अमोल चव्हाण,सिताराम घोडके,श्रीरंग चिमटे,काकासाहेब शिंदे यांनी स्पर्धेचे कामकाज पाहीले.

You missed

error: Content is protected !!