टाकवे बुद्रुक:
आंदर मावळतील कोंडीवडे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे .सोमवार दिनांक ६  फेब्रुवारी  ते सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी  पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे.

काकड आरती, विष्णुसहस्त्रनाम जप, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम महाराज गाथा वरील भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरीजागर असे  धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

अनुक्रमे  ह.भ.प.काळुराम महाराज घाग,ह.भ.प.अनंता महाराज शिंदे, ह.भ.प. विकास महाराज खांडभोर, ह.भ.प. पांडुरंग महाराज गायकवाड , ह.भ.प.नाथा महाराज शेलार, ह.भ.प. गुलाब महाराज कुंभार, ह.भ.प. सुखदेव महाराज ठाकर यांची प्रवचन होणार आहेत .

ह.भ.प.योगी आदित्यनाथ स्वामी महाराज , ह.भ.प.मयूर महाराज बोडके, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कुऱ्हाडे,ह.भ.प. माऊली महाराज शिंदे, ह.भ.प. माऊली महाराज कदम , ह.भ.प.राहुल महाराज इंदापूरकर , ह.भ.प.चंद्रकांत महाराज सूर्यवंशी यांची कीर्तने होणार आहेत.

वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण शंकर महाराज मराठे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्त्याची सांगता होणार आहे .पवळेवाडी, माऊ ,भोयरे, फळणे, शिंदेवाडी , कल्हाट, टाकवे बुद्रुक,घोणशेत, राजपुरी ,शिरे या गावांचे सामुदायिक हरी जागर होणार आहेत.

error: Content is protected !!