तळेगांव दाभाडे:
पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघ, मावळ  यांच्या वतीने  श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा  पुण्यतिथी सोहळा उत्सव  बुधवार दि. ८ फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे असून समाज बांधवांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष  मयुर प्रकाश ढोरे (नगराध्यक्ष, वडगांव मावळ) हे असून गुलाब गोविंद म्हाळसकर (मा. सभापती पंचायत समिती मावळ तालुका) , अबोली मयुर ढोरे (अध्यक्षा मोरया महिला प्रतिष्ठाण, वडगांव मावळ), रविंद्र माने (शहराध्यक्ष बीजेपी तळेगांव दाभाडे), रामदास वाडेकर (संपादक,मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन), जगन्नाथ काळे (पत्रकार दै. पुढारी) , गणेश विनोदे (पत्रकार दै. पुढारी) राजेश बारणे (आवाज न्युज) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची  भव्य मिरवणुक सकाळी ९ वाजता  पोटोबा महाराज मंदिर वडगांव येथून निघणार आहे. भव्य शोभा यात्रेसह  दीप प्रज्वलन, प्रतिमा पुजन,प्रास्ताविक, अध्यक्षीय मनोगत, प्रमुख अतिथी मनोगत  समाज बांधव/भगिनी परिचय,  महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघ, सांस्कृतिक महिला मंडळ, मावळ कार्यक्रमाचे आयोजक आहे.  द्वारकाधीश लॉन्स, न्यू इंग्लिश स्कूल, जवळ, पुणे मुंबई जुना हायवे, वडगांव मावळ येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.

You missed

error: Content is protected !!