साते येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात  यंदाचे ४८ वे वर्षे

वडगाव – मावळ
दरवर्षी प्रमाणे यंदाही साते येथे अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन दिनांक २२ ते २९  जानेवारी २०२३ दरम्यान केले. होते. यंदा ४८ वे वर्ष… चतुर्थ तप पूर्ती सोहळा असल्याने मोठ्या उत्साहात हरिनामसप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते.

सप्ताहाची सुरुवात वीणा पूजन करून झाली..रोज सकाळी काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण , गाथा भजन, सायंकाळीं हरिपाठ, कीर्तन आणि रात्री पंचक्रोशीतील गावांचे भजन असा सात दिवस दिनक्रम आनंदात पार पडला.. वर्षभर सर्व आपापल्या कामात व्यस्त असतात आणि मग हरीनाम मध्ये एकदा का मन गुंतविले की वर्षभर उत्साह मिळतो. आनंद , प्रेम,  भक्तीरसाने न्हावून सर्व गावकरी, लहानथोर, गायक, वादक, विणेकरी, सर्व विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन दिसत होती.

गावातील ज्येष्ठ नागरिक सोबत  बरेचसे युवक युवती ज्ञानेश्वरी पारायण करण्यास बसले होते.. गावातील दहा दहा कुटुंबासाठी एक दिवस देवून त्यांनी संपूर्ण दिवसाचे आयोजन भक्तिपूर्ण वातावरणात केले.. गत वर्षी प्रमाणे यंदाही सप्ताह चे आयोजन गावातील युवक वर्गाकडे सोपवीले होते.. उत्तमरित्या ही जबाबदारी सप्ताह कमिटी ने पूर्ण केली…सप्ताह मध्ये गुरुवर्य वै.पांडुरंग महाराज वैद्य (बाबा) यांचे पादुका अनावरण शांतीब्रम्ह गुरुवर्य मारोती कुरेकर बाबा यांच्या हस्ते झाले.

या सप्ताहात ह. भ. प. नारायण काळे, केशव मुळीक,  पुंडलिक मोरे, उत्तम बढे, पांडूरंग शितोळे, ज्ञानेश्वर सबलक, तुकाराम मुळीक यांची हरी भक्ती वर कीर्तने झाली. पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तनाचा आनंद घेतला  रथसप्तमीला श्री विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिवस दीपोत्सवाने साजरा झाला. शेवटी सप्ताह सांगता ह.भ. प. गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ यांच्या काल्याचे कीर्तनाने आणि दिंडी प्रदक्षिणा घेवून झाली.. काल्याचा महाप्रसाद वाटप झाले.

error: Content is protected !!