तळेगाव स्टेशन:
आंबळे ता.मावळ येथील वारकरी संप्रदायातील महादू चिंधू भांगरे (वय ७०)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,जवाई,नातवंडे,पुतणे असा परिवार आहे. मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गायनाचार्य अशी त्यांची ओळख होती. चंद्रकांत भांगरे व शाळा समितीचे अध्यक्ष व आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख सूर्यकांत भांगरे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!