प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यशाच्या शिखरावर पोहचून आनंद वाटणारा संतोष
मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन वाढदिवस विशेष :
चार चौघांच्या घरासारखी… त्याच्याही घरची परिस्थिती… तिच चुल..तोच गोठा..तसेच अंगण …तशीच भावंड अन तसाच गोतावळा..शेतातही तेच पिकते…अन  चुलीवरही तेच शिजायचे..प्रतिकूल परिस्थितीचा अनुभवही तोच..पण याच प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याचे वागणं आणि जगणं आम्हा सर्वाना भूषणावह आहे. त्याच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

ज्याचा आम्हाला अभिमान वाटावा असा आमचा लाडका बंधू म्हणजे संतोष गबाजी सातकर.कधीकाळी कारखान्यात कंत्राटी काम करणारा आमचा बंधू आज युनियन लीडर झाला आहे. इतकेच काय नोकरी, शेती आणि व्यवसायातही तो तितकाच कर्तबगार ठरतोय, याचे वेगळे समाधान आणि आनंद आम्हा सर्वाना आहे. हे सगळे आज आठवण्याचे आणि लिहिण्याचे कारण आज आमच्या बंधूरायांचा वाढदिवस आहे.आजच्या वाढदिवसानिमित्त त्याला आभाळभर शुभेच्छा. त्याच्या प्रगतीची चाके अशीच पुढे पुढे धावावे या मनःपूर्वक शुभेच्छा.

काका गबाजी सतू सातकर आणि मावशी हिराबाई गबाजी सातकर यांचा हा थोरला लेक. त्याच्या नावातच संतोष असल्याने आम्हा सर्व भाऊ बहीणींना आणि  अख्ख्या कुटुंबाला आनंदी  ठेवायचे तो व्रत जोपासतोय अगदी बालपणापासूनच.भाऊ  रघुनाथ, बहीण सुरेखा, वहिनी वनिता , वैष्णवी ,धनेश ही दोन मुले. भावेश,भूमी पुतण्या पुतणीवर त्याचे जीवापाड प्रेम. भावजय कविता  हिलाही बहिणी इतकेच मानाचे स्थान. सर्वाची ख्याली खुशाली तर तो विचारतोच. किंबहुना सर्वाच्या करिअरचे मार्गदर्शन तोच देतो.

चुलते नारायण सतू सातकर, देवराम सतू सातकर यांनाही तितकचे मानाचे स्थान.तर,भरत, नवनाथ ,विशाल ,संजय, किरण, वरसू या बांधवाना तोच बरोबरीचा दर्जा. घरातील सर्व घटकांना चुलत्या, आत्या, मावशी, काका, मामा, मामी या सगळ्याच्या तोंडात सहज येणारे नाव म्हणजे आमचा संतोष भाऊ. त्याचे बालपण कष्टातच गेले  कौटुंबिक जबाबदारीचे ओझे त्याने बालवयातच घ्यायला सुरुवात केली. घरातील चुली पासून गोठया पर्यत आणि गुरे वासरे संभाळण्या पासून शेताच्या बांधापर्यंत सगळी कामे तो बालवयातच शिकला तेही शिक्षण घेता घेता.

पहिली ते सातवीपर्यंत त्याचे शिक्षण कान्हेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यामंदिरात झाले  शाळेत असतानाच अभ्यासात पहिला किवा इतर दुसरा नंबर यायचाच. घरी वडिलांचा दुग्ध व्यवसाय त्याला शेतीची जोड .खरंतर शाळा दहा वाजता असल्याने  सकाळी संतोषला गाई वासरे  चारायला रानात घेऊन जावे लागायचे. घरचे सर्वे काम करून दहा वाजता पळत पळत शाळा गाठायची असा  त्याचा दिनक्रम याच धावपळीत त्याने १९९५ साली  दहावीची परीक्षा दिली आणि वर्गात तो दुस-या नंबरने उत्तीर्ण झाला.

दहावीची परिक्षा दिली अन लगेच त्याने एका कंपनीत कंत्राटी कामावर जायला सुरूवात केली. काम करता करता परीक्षेचा निकाल जवळ आला. आणि दहावीच्या परीक्षेत ६८  टक्के गुण मिळवून वर्गात दुसरा नंबर आला याचा फार मोठा आनंद होता. पुढे करायचं काय हाही प्रश्न होताच .घरची परिस्थिती बेताचीच .दूध व्यवसायावरती सगळं अवलंब म्हणून पहिला नोकरीचा विचार केला .दहावीचा निकाल लागला आणि लोणावळ्याच्या आयटीआयटी आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशन हा कोर्स त्याने पूर्ण केला. आयटीआय ला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यावर महिंद्रा कंपनीत  ट्रेनी म्हणून काम केले.

१९९९ ते २००० मध्ये जागतिक मंदीच होती .त्या मंदीचा फटका संतोषला सोसावा लागला. हातचे काम गेले,म्हणून शांत बसेल तो संतोष कसला त्याने अनेक युक्त्या लढवून शेतीला पाणी आणले. शेतीत राबणे एकीकडे सुरू होते तर दुसरीकडे नोकरीचा शोध. दोन वर्षानी सुप्रीम इंडस्ट्रीज मध्ये नोकरी मिळाली. काम करता करता कष्ट केले हाताला काम मिळत राहिले.एक न दोन अनेक व्यवसाय सुरू करायच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरू लागले. कुटूंबातील सगळ्यांच्या मदतीने व्यवसाय सुरू झाला. ट्रान्सपोर्टच्या पाठोपाठ, किराणा मालाचे दुकान ,पिठाची गिरणी याही व्यवसायात घरातले रमू लागले .

सेकंड हॅण्ड टेम्पो पासून सुरू केलेला संतोष चा ट्रान्सपोर्ट व्यवसाय समृद्ध करण्यासाठी आई वडीलांचे आशीर्वाद मिळाले. भावांची साथ मिळाली. एकीकडे सगळेच व्यवसाय संभाळणे सुरू होते तर दुसरीकडे नोकरी आणि शेती अशा तिहेरी कामात संतोषचे करिअर सुरू होते. शेती करता करता घरातला व्यवसाय सांभाळणे चालूच होते. आर्थिक सुबत्ता येतच होती.या दरम्यान कंपनीमध्ये लीडरशिप करायची संधी मिळाली आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार संघटनेमध्ये जबाबदारी स्वीकारली.

युनियनचा अध्यक्ष  म्हणून मिरवतानाचा आनंद एकीकडे होता.दुसरीकडे कंपनीची आणि कामगारांच्या हिताची जबाबदारी देखील होती. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संतोषने पुढाकार घेतला. एग्रीमेंट झाले कामगारांच्या पगारात वाढ झाली. याशिवाय कामगारांना इतर अनेक सुविधा मिळाल्या. या सुविधा  मिळाव्यात यासाठी त्याची आजही  धडपड सुरू आहे. कालही होती आणि उद्याही असेल त्याचा भाऊ म्हणून आम्हाला हा विश्वास आहे. समाज जीवनात काम करताना व्यवसायिक व  कौटुंबिक  जबाबदाऱ्या होत्याच. त्याचबरोबर नोकरी होती .आणि नोकरी करता करता संतोषने  हे सगळं यश पाहताना आज आनंदाने आमचा ऊर भरून येतो.संतोषचे राजकीय काम पण कौतुकास्पद आहे. भारतीय जनता पक्षाचे गाव अध्यक्ष पद संतोष यशस्वीपणे सांभाळतो. पक्ष निष्ठा शिरवंद मानून तो काम करीत आहे.

कधीकधी  गोराढोरांच्या मागे पळताना जो आनंद व्हायचा. तोच आनंद आज ट्रान्सपोर्टची वाहन चालवताना आनंद होतोय असा आमचा भाऊ संतोष गबाजी सातकर आम्हाला सांगतोय हे ऐकताना संतोषचे पाय आजही जमीनीवर तसेच घट्ट रोवले आहे,हे पाहून खूप खूप समाधान वाटते. लाडक्या भावाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत शब्दांना पूर्णविराम देतो.
( शब्दांकन-सोमनाथ शंकरराव भोसले, उद्योजक)

error: Content is protected !!