टाकवे बुद्रुक:
विठ्ठल रुक्मिणी यात्रेच्या निमित्ताने टाकवे बुद्रुक येथे भव्य  बैलगाडा शर्यतीचे  आयोजन करण्यात आले होते. वडगाव मावळचे माजी जि.प.सभापती बाबुराव वायकर यांच्या बैलगाड्यास पहिल्या दिवसाचा, तर  दुसऱ्या दिवसाचा लक्ष्मण जाधव नऊलाख उंबरे यांच्या बैलगाड्यास घाटाचा राजा हा मानाचा किताब मिळाला.

राज्य शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार नियम व अटीचे पालन करून टाकवे बुद्रुक येथे बैलगाडा शर्यतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या ठिकाणी पाहणी करण्यासाठी वडगाव मावळचे पोलीस पथक दाखल झाले होते.

टाकवे बुद्रुक येथील भाविकांचे विठ्ठल रुक्मिणी श्रध्दास्थान आहे. येथे आंदर मावळ व नाणे मावळ मधील सर्वात मोठी यात्रा भरते. टाकवे बुद्रुक बैलगाडा संघटना कमिटी यांच्या वतीने घाटाचे पूर्ण नियोजन करण्यात आले होते.
 

टाकवे बुद्रुक येथे दोन दिवस बैलगाडा शर्यत पार पडली या मध्ये ऐकून 340 बैलगाडा मालकांनी या ठिकाणी नाव नोंदणी करून बैलगाडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात्रा कमिटीच्या वतीने विजेता ठरणाऱ्या बैलगाडा मालकास मोटरसायकल. एल ई डी टीव्ही, फ्रिज आधी वस्तू इनाम म्हणून देण्यात आल्या .
–  नंदू भागुजी असवले बैलगाडा यात्रा कमिटी अध्यक्ष

बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलाचे स्वास्थ्य प्रमाणपत्र व लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्यात आले आहे की नाही हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच बैलगाडा घाटात कोणीही बैलांवरती अत्याचार करणार नाही याची दक्षता यात्रा कमिटीने घेणे गरजेचे आहे.
संदेश शिर्के, प्रांत अधिकारी.

•• पहिल्या दिवसाचा घाटाचा राजा 
बाबुराव वायकर वडगाव मावळ यांचा बैलगाडा 11.40 मध्ये घाटाचा राजा ठरला.
तर फायनल मध्ये.
1) सदाशिव महिपती लांडगे  (भोसरी हवेली) 11.82,
2) साईनाथ नंदकुमार कुटे (  पिंपळे सौदागर ) 11.85,
3)  विलास बबनराव काळोखे (तळेगाव दाभाडे) 11.92

•• *दुसऱ्या दिवसाचा घाटाचा राजा* 
लक्ष्मण जाधव यांचा बैलगाडा 11.39 मध्ये घाटाचा राजा ठरला.
तर फायनल
1)  बबन मारुती पवार ( मंगरूळ मावळ) 11.99,
2) लहू शांताराम बधाले ( बधालेवाडी) 12.04,
3) सुरेश हुकाजी गायकवाड. (वेहरगाव.)  12.18

error: Content is protected !!