कामशेत:
  पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मारूती नाणेकर पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सहा मुली, सुना,जवाई, नातवंडे असा परिवार आहे.
  मावळ तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यात नाणेकर पाटील सक्रीय होते. पोलीस पाटील म्हणून त्यांचा मोठा दबदबा होता. हाडाचे शेतकरी अशी त्यांची ओळख सर्वश्रुत आहे.
  पाटील यांच्या निधनाने पंचक्रोशीत दु:ख व्यक्त होत आहे. सरपंच विश्वनाथ तुकाराम नाणेकर त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!