कामशेत:
मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांच्या
युवा पर्व फाउंडेशन कैलासभाऊ गायकवाड दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी  जपसंपदा मंत्री,खासदार सुनिल तटकरे व ममाजीमंत्री  मदन बाफना यांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी आमदार सुनील  शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्थाचे उपाध्यक्ष  बापूसाहेब भेगडे  , राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, सभापती बाबुराव वायकर,दिपक  हुलावळे, सुभाष जाधव,नामदेव  दाभाडे,संदीप  आंद्रे,नारायणराव ठाकर,चंद्रकांत  दाभाडे, किशोर सातकर,राज  खांडभोर, सुनील भोंगाडे, सचिन मुऱ्हे उपस्थित होते.

मागील  अनेक वर्षापासून कैलास गायकवाड आंदर मावळ,नाणे मावळ परिसरातील राजकीय व सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाळ जोडलेला युवा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख या परिसरात आहे. दिनदर्शिकेच्या निमित्त जनतेशी नाळ जोडून ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!