वडगाव मावळ:
  मावळ विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. मनसेचे पक्षप्रमुख  राज ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी (दादर-मुंबई) महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे देखील प्रदान करण्यात आली.

    यावेळी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांसह मनसे महिला आघाडी प्रमुख रिटा गुप्ता ,पक्ष नेते गणेश सातपुते, किशोर शिंदे, हेमंत संभूस, सचिन चिखले आदी नेते आणि मावळ तालुक्यातील मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ विधानसभेतील मनसेचे नवनियुक्त उप तालुकाध्यक्ष
अनिल लालगुडे (वराळे खडकाळा), संतोष मोधळे (टाकवे बुद्रुक नाणे) अनंता तिकोने (कार्ला कुरवंडे) सतीश कारके (कुसगाव बुद्रुक सोमटणे) पौरस बारमुख (चांदखेड काले) संदीप शिंदे (इंदोरी तळेगाव ग्रामीण)

मावळ विधानसभेतील मनसेचे नवनियुक्त शहराध्यक्ष
भारत चिकणे (लोणावळा खंडाळा), विजय गायकवाड (कामशेत शहर) मच्छिंद्र मोहिते (वडगाव शहर), सुरज भेगडे (तळेगाव दाभाडे शहर) सुरेश भिंगारिया (देहूरोड शहर) बालाजी झोंबडे (देहूगाव शहर)

मावळ विधानसभेतील मनसेचे नवनियुक्त महिला तालुका आणि शहराध्यक्ष
ज्योती पिंजन (तालुका अध्यक्ष मावळ), संगीता गुजर (शहराध्यक्ष लोणावळा खंडाळा) शोभा कळसकर (शहराध्यक्ष देहूरोड शहर) अर्चना ढोरे (शहराध्यक्ष वडगाव शहर)

You missed

error: Content is protected !!