मुंबई:
  मराठा काॅमर्स ऑफ चेंबरचे सदस्य, उद्योजक व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस विक्रम कदम यांच्या ‘राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे ‘विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
  या राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे युवा नेते पार्थदादा पवार यांनी कौतुक करीत शुभेछा दिल्या. राष्ट्रवादीचे माजी प्रदेश चिटणीस विक्रम कदम मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी राष्ट्रवादी दिनदर्शिका प्रकाशित करीत आहेत.
 
  या दिनदर्शिकेत बाराही महिन्याच्या सण समारंभाची माहिती असते. शिवाय वेगवेगळे उपक्रम यांना प्राधान्य दिले जाते. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या छबी असलेली दिनदर्शिका मावळ तालुक्यांसह जिल्ह्यात वितरित करण्यात येते.
 
  यंदाची दिनदर्शिका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी प्रकाशित करण्यात आली. यावेळी प्रदेश राष्ट्रवादीचे चिटणीस विक्रम कदम,उद्योजक संतोष कदम,राष्ट्रवादीचे मावळ तालुका प्रवक्ते राज खांडभोर,उद्योजक राजू पडवळ उपस्थित होते.
 
  विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या दिनदर्शिका बाबत समाधान व्यक्त करीत मावळ वासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. विक्रम कदम हे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात आहे.

error: Content is protected !!