महर्षी कर्वे आश्रम शाळा राजमाता जिजाऊ माँसाहेब याच्या जयंती साजरी
कामशेत :
सह्यादी विद्यार्थी अकादमी मावळ वर्धापनदिन आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब याच्या जयंती निमित्त महर्षी कर्वे आश्रम शाळा,कामशेत येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आली.

यावेळी विद्यार्थीनीने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा परिधान केली होती. व अनेक विद्यार्थीनीनी भाषना मधून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉंसाहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. जिजाऊनी स्त्री अन्याय विरुद्ध आवाज उठवून स्त्रीयांना मानसन्मान मिळण्यासाठी तसेच रक्षणासाठी तेव्हाही कार्य केले.

ह्या युगात मुलींन सोबत घडणार्‍या घटना पहाता मुलींना वाईट प्रसंगात विरोध करता यावा. त्‍यांनी वेळप्रसंगी स्‍वत:चे रक्षण स्‍वत: करावे, या उद्देशाने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम शाळा येथे विद्यार्थिनींसाठी लाठी-काठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्‍यात आले होते.
मुलींना आता काळानुरूप शिक्षणासमवेत स्‍वत:चे रक्षण करण्‍याचे शिक्षण घेणे आवश्‍यक होत चालले आहे.

विद्यार्थिनींना स्‍वसंरक्षणाचे महत्त्व पटवून त्‍यांना सक्षम बनवण्‍याच्‍या अनुषंगाने मर्दानी खेळ असोसिएशनचे किरण अडागळे यांच्या माध्यमातून मुलींना लाठीकाठी प्रशिक्षण आणि स्‍वसंरक्षणासाठी बिना हत्यारही बचाव करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी पूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थीनीसाठी असे लाठी-काठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार असल्याचे सह्यादी विद्यार्थी अकादमीच्या वतीने सांगण्यात आले.

या वेळी सह्यादी विद्यार्थी अकादमीचे चेतन वाघमारे, सचिन शेडगे, किशोर वाघमारे, सत्यम तिकोने, संजय कटके, केदार डाकवे, सुषमा साबळे, संदीप जाधव,अश्विन दाभाडे, लक्ष्मण शेलार, संदीप गुढीगार, विकास वाघमारे, किशोर लष्करे, सूरज वाळके इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!