वडगाव मावळ:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, पुणे यांच्या  विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे पवन मावळातील बौर (ब्राह्मणवाडी)येथे उद्घाटन करण्यात आले.

  युवकांचा ध्यास:गावचा विकास या अंतर्गत दिनांक १६|१|२०२३ ते २२|१|२०२३ पर्यंत व्याख्यान होणार आहे. उद्घाटन समारंभ  प्राथमिक शाळेत पार पडला . सरपंच श्री प्रविण भवार व माजी सरपंच श्री संदीप खिरीड यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ.माधुरी खांबेटे ( प्राचार्य कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय पुणे )या  होत्या.
 
सौ.सावित्रबाई दाभाडे उपसरपंच,श्री संदीप खिरीड माजी सरपंच, श्री शंकर शिंदे सदस्य,श्रीमती साधनाताई भवार सदस्या, सौ.अश्विनीताई दळवी सदस्या, श्रीमती मंगल मगर माजी उपसरपंच,सौ.प्रमिला वायभट सदस्या, श्री.मारूती वाळुंज माजी सरपंच, श्री.बबन शिंदे माजी चेअरमन, श्री सतिश  वाळुंजकर,संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका, श्री गणेश वाळुंजकर अध्यक्ष मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, श्री संतोष वाळुंजकर अध्यक्ष शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती, श्री राजू लोंढे मुख्याध्यापक, श्री गोविंद कदम मुख्याध्यापक, श्री.तानाजी शेखरे मुख्याध्यापक, श्री अर्जुन खिरीड मुख्याध्यापक, श्री.विजय खिरीड अध्यक्ष शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती उपस्थित होते

ग्रामस्वच्छता अभियान २)१० वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ३) आरोग्य शिबीर ४)मतदानाचे महत्त्व व नोंदणी ५) पथनाट्य -बालविवाह निर्मुलन जागृती व्यसन निर्मुलन ६) मतदान जनजागृती रॅली ७) प्रदूषण निर्मुलन जनजागृती रॅली ह्याप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक २२|१|२०२३ साय.४ वाजता कार्यक्रमाचा समारोप होणार आहे
शिबारा मध्ये सुमारे पन्नास विद्यार्थ्यांनीने सहभागी घेतला आहे.

विद्यापठा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल बऊर ब्राम्हणवाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच श्री संदीप खिरीड यांनी प्राचार्य व सर्व शिक्षक यांचे आभार मानले व स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!