कामशेत- पोलीस वर्धापन दिनानिमित्ताने कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी शस्त्रांबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास यासंदर्भात मार्गदर्शन केले.

या वेळी पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस नाईक प्रवीण विरनक, पोलीस शिपाई अमोल ननावरे उपस्थित होते. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका विद्या ठोंबरे, ज्येष्ठ शिक्षक मुकुंद ढोरे, दत्तात्रय गायकवाड, नितीन शेलार, सुधा हांडे, सुरती पाडवी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. प्राचार्य संपत धावडे, उपप्राचार्य धनश्री साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. दत्ता पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

You missed

error: Content is protected !!