शिष्यवृत्ती परीक्षेत आढले बुद्रुक शाळेचे यश
सोमाटणे:
    पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आढले बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीचे मानकरी ठरले असल्याची माहिती मुख्याध्यापिका  उषा सरकटे यांनी दिली. या परीक्षेत पाचवी इयत्ता शिकणारी नूतन शेष घोटकुले ही विद्यार्थिनी ( 254 गुण) मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 344 वा क्रमांक  तिने तालुक्यात चौथा क्रमांक मिळवला आहे.
      कार्तिकी काळुराम शिर्के ही विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादी 387 क्रमांक व तालुक्यात पाचवी आली आहे.वैष्णवी शहाजी सपकाळ हे विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादी 432 क्रमांक आणि तालुक्यात सातव्या आली आहे .  शाळेचे एकूण 21 विद्यार्थ्यांपैकी  17  विद्यार्थी पात्र झाले आहेत.
     
तसेच 6 विद्यार्थी 200 गुणांच्या पुढे गुण संपादन केलेले आहेत.वर्गशिक्षक ल.श्री. कांबळे, वैशाली माळी  मुख्याध्यापक उषा सरकटे ,सिताराम वाढवणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  वाळुंज , शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर कुलकर्णी , केंद्रप्रमुख  विजय माने  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
  आढले बुद्रुक गावचे सरपंच  विश्वासराव घोटकुले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  रोहिदास जाधव, सदस्य सुजितकुमार घोटकुले सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

error: Content is protected !!