तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभ संपन्न
तळेगाव दाभाडे :
पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग, पंचायत समिती मावळ यांचे वतीने एम आय टी ज्यूनिअर कॉलेज च्या दालनात दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून  तनाज सय्यद व माध्यमिक गटातून दिव्य  भाटीया यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

समारोपाच्या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड,एम आय टी काॅलेज चे प्राचार्य विनोद साळवे व मान्यवरांच्या  हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी विश्वस्त बी एम भसे, शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, स्नेहल बाळसराफ आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी  लहान गटात ५२ प्रकल्प प्राथमिक शिक्षक ०३, इयत्ता नववी  ते इयत्ता बारावी  मोठागट ४९ प्रकल्प माध्यमिक शिक्षक ०४ प्रयोगशाळा परिचर ०१ असे एकून १०९ प्रकल्प सादर करण्यात आले होते. एकून ६४ शाळांनी सहभाग घेतला. परिक्षक म्हणून रेश्मा यादव, अशोक सोनवलकर, रोहन साठे, अनंता दामगुडे, मारूती खेडेकर यांचे बरोबर ठरावीक विज्ञान अध्यापकांनी काम पाहीले.

प्रदर्शन यशस्वी  होण्यासाठी  एम आय टी कॉलेजचे प्राचार्य विनोद साळवे, सुरेश सुतार, वसंत  बुरांडे,कपिल  खंदारे, ज्योती लावरे यांनी विशेष मेहनत घेतली.  प्रास्ताविक विनोद साळवे यांनी केले. सुत्रसंचलन  शलाका गायकवाड यांनी केले तर आभार विठ्ठल माळशिकारे यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल
विज्ञान प्रकल्प प्राथमिक गट (६वी ते ८ वी )
प्रथम :  तनाज इरफान सय्यद (ऑक्सिलिअम हायस्कूल लोणावळा)
द्वितीय :साई संतोष दळवी (एकविरा विद्या मंदिर कार्ला)
तृतीय क्रमांक : शंतनू प्रकाश कांबळे (वरसुबाईमाध्यमिक विद्यालय माळेगाव)

विज्ञान प्रकल्प माध्यमिक गट (९ वी ते १२ वी )
प्रथम :  दिव्य कुणाल भाटीया (एम आय टी कॉलेज तळेगाव दाभाडे)
द्वितीय :रुजुला शंकर जगदाळे (सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे)
तृतीय क्रमांक : ओमकार प्रशांत शेटे ( प्रगती विद्या मंदिर इंदोरी)

निबंध स्पर्धा प्राथमिक गट (६वी ते ८ वी )
प्रथम :  योगिता तानाजी थडके (नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे)
द्वितीय :वैष्णवी संतोष खेडकर (रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे)
तृतीय क्रमांक : सानिका हनुमंत करपे (पवना विद्यामंदिर पवनानगर)

निबंध स्पर्धा माध्यमिक गट (९ वी ते १२ वी )
प्रथम :  प्राची मारोती म्हस्के (भैरवनाथ विद्यामंदिर वराळे)
द्वितीय :ऋतुजा रुपेश गोडसे (बालविकास विद्यालाय तळेगाव दाभाडे)
तृतीय क्रमांक : ऋतुजा सुभाष चव्हाण (प्रगती विद्या मंदिर इंदोरी)

वकृत्व स्पर्धा  प्राथमिक गट (६वी ते ८ वी )
प्रथम :  आदिती रवींद्र बेंचे (रामभाऊ परुळेकर विद्यालय तळेगाव दाभाडे)
द्वितीय : संस्कृती सुधीर कालेकर ( व्ही पी एस हायस्कूल लोणावळा)
तृतीय क्रमांक : अनुष्का संदीप टकले ( न्यू इंग्लिश स्कूल भोईरे)

वकृत्व स्पर्धा  माध्यमिक गट (९ वी ते १२ वी )
प्रथम :  मानसी सुरेश भालसिंगे (गोल्डन ग्लेड विद्यालय करंजगाव)
द्वितीय : समृद्धी संदीप महाजन (आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे )
तृतीय क्रमांक : जान्हवी श्रावण महाजन (प्रगती विद्या मंदिर तळेगाव इंदोरी)

प्रश्नमंजुषा स्पर्धा  प्राथमिक गट (9 वी ते 12 वी )
प्रथम :  तेजल इंगळे व सर्थक कुंभार (न्यू इंग्लिश स्कूल वडगाव )
द्वितीय : शुभम संताजी माळी व सुरज विक्रम अरदवाड (अँड पु वा परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे)
तृतीय क्रमांक : स्वरूप पवार व आदित्य वाघ (नवीन समर्थ विद्यालाय तळेगाव दाभाडे)

शैक्षणिक प्रतिकृती प्राथमिक शिक्षक गट
प्रथम : राहुल सूर्यवंशी (फझलानी इंटरनँशनल स्कूल ……)
द्वितीय : पांडुरंग ढेंगळे (जि. प. प्राथ. शाळा महागाव)
शैक्षणिक प्रतिकृती माध्यमिक शिक्षक गट
प्रथम : अशोक धनोकार (श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे)
द्वितीय : सविता केंगाळे (सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे)
शैक्षणिक प्रतिकृती प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर गट
प्रथम : गणेश देशपांडे ( सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!