राज्यस्तरीय नेटबाॕल स्पर्धेत पुणे जिल्हा संघाला सुवर्ण पदक
कार्ला-
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  ३६  वी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा  नागपूर येथे संपन्न झाली. या नेटबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा पुरुष संघाने गोंदिया जिल्हा संघाचा अंतिम सामन्यात ४३/३९ अशा चार गुण फरकाने विजय संपादन करून सुवर्णपदक प्राप्त केले.

उपांत्य सामन्यात पुणे जिल्हा संघाने भंडारा जिल्हा संघाला ३८/२९ गुण फरकाने पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये संघाचे कर्णधार समीर सिकीलकर तसेच अविनाश पाटील, पृथ्वीराज पवार व इतर खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
अंतिम सामना पाहण्यासाठी व पारितोषिक वितरण समारंभासाठी नागपूर जिल्ह्याचे सहसंचालक श्री पाटील, नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आबा तुपे, सचिव  मानसिंग वाबळे यांनी विजेत्या संघाचे खेळाडू, संघाचे प्रशिक्षक  सुनील मंडलिक, संघ व्यवस्थापक प्रथमेश जाधव यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा संघाला अश्वजीत सोनवणे,संतोष पाचारणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

पुणे जिल्हा नेटबॉल संघाचे खेळाडू पुढीलप्रमाणे :- समीर सिकीलकर (कर्णधार), शुभम कोडक, आरिफ मुजावर, अविनाश पाटील, ओंकार नरके, प्रसाद शिवेकर, सर्वेश अडसुळे, पृथ्वीराज पवार, रोहित जाधव, दत्तात्रय कोल्हे, दीपक डूंगाहू, अलीम शेख हे खेळाडु सहभागी झाले होते.

error: Content is protected !!