मावळसत्य लाईव्ह बुलेटीन विशेषः
आमच्या सर्वांच्या घरची परिस्थिती सारखीच  अन बेताची.आमचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. पण सामाजिक वसा लाभलेले. तितकाच राजकीय वारसा देखील. हाताला काम मिळावे म्हणून ऐंशीच्या दशकात आमचे आप्पा हरिश्चंद्र यशवंत वाडेकर तालुक्याच्या गावात राहू लागले. कुटूंब चालवताना लागणारी सर्व जबाबदा-या पार पाडीत काही वर्षे लोटली. आणि लेक हाताशी आला. आमचा दादा वैभव भाऊ.

हाताशी आलेला लेक वडीलांच्या आधाराची काठी. तसा  आमचा  वैभव  भाऊही  आप्पांचा काठी बनला आणि आमच्या कुटुंबाशी साठी जबाबदार लेक ठरला.वैभव हरिश्चंद्र वाडेकर असे माझ्या या भावाचे नाव. कसलाही दिखाऊपणा नाही की, बडेजाव नाही. आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडीत असताना जीवाभावाचे मित्र मिळवायचे आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन आनंदाने राहायचे हाच त्याचा दिनक्रम.

अत्यंत संवेदनशील आणि तितक्याच हळव्या मनाचा वैभव भाऊ. खूप मोठी स्वप्न मनात साठवलेला आणि त्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारा, धावणारा हा तरूण. परिस्थितीवर मात करीत यशस्वी पणे पाऊले टाकीत आहे,याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या कष्टासाठी पडणा-या  पावलाला बळ मिळेल हा विश्वास घेऊन तो राबतोय, कष्ट करतोय धडपड करतोय हे पाहताना मनात एक वेगळे समाधान आणि आनंद आहे.

बालवयातच उन पावसाचे चटके सहन असले तरी यातून बाहेर पडता येते आणि यशस्वी होता या सकारात्मक बीजाचे रोपण त्याने मनावर घातलेच आहे. त्याच्या या संघर्षात आई, वडीलांचे आशीर्वाद, बहीण भावांच्या आणि आप्तस्वकीयांच्या शुभेच्छा आणि वहिनींची साथ आहे. अगदी वहानगाव सारख्या खेड्यातील हा तरूण शहरात राबतोय,कष्ट करतोय.

वहानगाव सारख्या खेड्यातील हा तरूण शहरात कष्ट करून राहतो, त्याला नक्कीच सुगीचे दिवस आहे. चांगले कर्म करणाऱ्याला नियती मदतीची ओजळ भरून उभी असते ही ओंजळ त्याला यशस्वी करेल याच वाढदिवसानिमित्त अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
(शब्दांकन- आदित्य रामदास वाडेकर,स्वप्ननगरी तळेगाव स्टेशन)

error: Content is protected !!