वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील पोल्ट्री  क॔पन्यानी फार्मरना संवर्धनाकरिता दिलेले पक्षी वेळेत उचलुन(लिफ्टिंग) न्यावेत  अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री  योद्धा संघटनेने केली आहे.

   संघटनेच्या   कार्यकारी मंडळाची विशेष सभा  वडगाव मावळ येथे संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आली होती .या सभेस राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे राज्य संघटक सोनबा गोपाळेगुरूजी,तालुका  उपाध्यक्ष  संतोष घारे , सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बधाले , संचालक  बाबाजी पाठारे, अमोल  शिंदे , शिवाजी कारके,  सचिन गरुड  ग,णेश आलम , सोपान  चव्हाण  ,श्रीरंग सुतार , संदिप  शिंदे  ,ज्ञानेश्वर  खंदारे उपस्थित होते.
  
   यावेळी मावळ तालुक्यातील  काही पोल्ट्री कंपन्या या तयार  झालेले  पक्षी उचलुन  घेऊन जाण्यासाठी खुप विलंब  करतात.त्यामुळे  फार्मरचा  अकारण  खर्च  वाढुन  नुकसान  सोसावे  लागते. 
  
    कंपन्या  आणी फार्मर यांच्यातील  कराराप्रमाणे संवर्धनासाठी दिलेले पक्षी  ४० ते४५ दिवसात कंपन्यांनी उचलुन  नेणे  उपेक्षित  आहे.मात्र काही  कंपन्या  ह्या ५५ ते ६० दिवस  होईपर्यंत पक्षी  नेत नाहीत.परिणामी या वाढीव  काळात  पक्षी जर मरण ठेवल्यास फार्मरना मोठा  तोटा  सोसावा लागतो.त्यामुळे  तयार  झालेले पक्षी  कंपन्यानी वेळेवर  उचलावीत अशी मागणी  शेतकरी बांधवाकडून होत आहे.

error: Content is protected !!