तळेगाव दाभाडे येथे पत्रकार दिन साजरा
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आला.
तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या अंबर येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपमुख्याधिकारी सुप्रिया शंदे, पोलिस निरीक्षक नितीन लांडगे, तळेगाव शहर वाहतूक विभागप्रमुख विशाल गजरमल, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माऊली दाभाडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक अरुण माने, जयंत कदम यांचे हस्ते प्रतिमा  पूजन करण्यात आले.
या वेळी पत्रकार संघाचे संस्थापक सुरेश साखवळकर, अध्यक्ष मनोहर दाभाडे, उपाध्यक्ष तात्यासाहेब धांडे, सचिव सोनबा गोपाळे, खजिनदार बी. एम. भसे, सुनील वाळूंज, अतुल पवार, प्रभाकर तुमकर, गणेश बोरुडे, राजेश बारणे, राजेंद्र जगताप,श्रीकांत चेपे, रवींद्र काळोखे उपस्थित होते.
उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे म्हणाल्या,: स्वातंत्र्यपूर्व काळात मत मांडायचा अधिकार नव्हता, त्या काळात बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणमधून समाजप्रबोधन केले. पत्रकारांची बाजू मांडताना ती सर्व समावेशक असावी.
मेधावीन फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे, माजी नगराध्यक्ष माया भेगडे, संत तुकाराम सहकारी पूजन साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य अरुण माने, तळेगाव शाहू-फुले-आंबेडकर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर, सचिव जयंत कदम यांनी पत्रकारांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. समर्थ विद्यालयामध्ये पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन सोनबा गोपाळे यांनी केले. स्वागत अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी केले.अतुल पवार यांनी आभार मानले.

error: Content is protected !!