पंडित नेहरू विद्यालयात भारतीय मानक ब्युरो चे उदघाटन 
कामशेत  ::
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पंडित नेहरू विद्यालयात माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार  साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय मानक ब्युरो ( BIS )चे उद् घाटन  कामशेत शहराचे  पोलीस अधिकारी श्री संजय जगताप आणि  महिला रा. काँ अधिकारी सौ.रुपालीताई गराडे , मा. मुख्याध्यापक श्री धावडे* *एस.आर.यांचे हस्ते करण्यात आले. *वाढदिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. या प्रदर्शनामध्ये बी.आय. एस. क्लब, बी.आय.एस.केअर ॲप बद्दल*   *ग्रामस्थांना विद्यालयातील बी. आय.एस. क्लबच्या सदस्या श्रीमती पाटील एच. व्ही. यांनी माहिती दिली.
              बी.आय.एस.क्लब मधील सर्व विद्यार्थी सदस्यांनी  लोकांमध्ये  बी.आय.एस. लोगो, ISI मार्क, FPO,  रजिस्ट्रेशन मार्क यांचे लोगो  असणाऱ्या रांगोळ्या काढून जनजागृती केली.व आलेल्या पाहुण्यांना वस्तूंची गुणवत्ता कशी चेक करावी व दैनंदिन जीवनात ग्राहकांची होणारी फसवणूक  टाळण्यासाठी ची माहिती बी. आय.एस.क्लब ची विद्यार्थी प्रतिनिधी इयत्ता नववी ब मधील प्रज्ञा काजळे, व अंकिता खानेकर हिने दिली.तसेच  आठवी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बी आय एस क्लब ची स्थापना बी.आय.एस.क्लब चे कार्य,उद्दिष्टे, बी.आय.एस. केअर ॲप वरून वस्तूचा मानांक कसा पाहावा, सोन्याचे प्रमाणीकरण  कसे तपासावे याची माहिती विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती पाटील मॅडम यांनी दिली .
या कार्यक्रमासाठी माननीय मुख्याध्यापक श्री धावडे एस. आर.  मा. उपमुख्याध्यापिका सौ साबळे डी. व्ही.मा. पर्यवेक्षिका सौ ठोंबरे व्ही एस तसेच विज्ञान विभागाच्या सौ शेळके आर पी, भिसे मॅडम, श्री मिंचेकर सर सर्व  विज्ञान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

You missed

error: Content is protected !!