आळंदी:
भारतीय जनता पार्टीची पुणे जिल्ह्याची बैठक फ्रुटवाले धर्मशाळा येथे झाली. या बैठकीत एकूण सात विषयावर चर्चा व मांडणी झाली व आगामी काळामध्ये हे विषय पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात, परीक्षा पे चर्चा, धन्यवाद मोदी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, जी ट्वेंटी, जिल्हा नियोजन समिती मधील करावयाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीचे उद्घाटन  आमदार राहुल कुल यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी संघटनेचा आढावा घेतला.
 
सर्व  विषयांची मांडणी सरचिटणीस अविनाश बवरे यांनी केली.  जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, रवी अनासपुरे, यांनी मार्गदर्शन केले.माजी मंत्री बाळा भेगडे, जालिंदर कामठे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, प्रदीप दादा कंद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, धर्मेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, दादा सातव आळंदी शहराचे अध्यक्ष किरण येळवंडे ,नगरसेवक पांडुरंग वहिले, पांडुरंग ठाकूर, अॅड.आकाश जोशी  आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता  उमरगेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!