राष्ट्रवादी महिला काँग्रेसची महागाई व बेरोजगारी विरोधात जनजागर यात्रा
देहू:
वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.मावळ तालुक्यात श्रीक्षेत्र देहूगाव ते लोणावळा असे यात्रेने मार्गक्रमण केले.

देहू येथे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दर्शन घेऊन यात्रेला प्रारंभ करण्यात आला. देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत मार्गे ही जनजागर यात्रा लोणावळ्या कडे रवाना झाली. या यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. नागरिकांनीही यात्रेत सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर होत असलेली भाववाढ गृहिणींना कळत असून त्यामुळे महिन्याचे बजेटही कोलमडले आहे. ह्या जनजागर यात्रेत प्रामुख्याने महागाई, बेरोजगारी, वेतन, बेताल वक्तव्य, शेतकरी असंतोष, महिला सुरक्षा, अशा सर्व विषयांवर यलगार करण्यात आला. वाढत असलेल्या घरघुती गॅस, इंधनाच्या किंमतीवर आवाज उठवण्यात आला.
यावेळी आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक कविता म्हेत्रे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे,माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,गटनेते  साहेबराव कारके, सचिन घोटकुले, संदीप आंद्रे, अतुल राऊत, दिपाली गराडे, अॅड. रुपाली दाभाडे, शितल हगवणे, पुष्पा घोजगे, संध्या थोरात, वर्षांताई नवघणे, यांच्यासह नगरसेवक, स्थानिक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्या चव्हाण म्हणल्या,”  सरकार विरुद्ध आवाज उठवणाऱ्याचा आवाज दाबला जातोय. प्रचंड महागाई वाढली असून भाजीपाला तसेच घरघुती गॅस ४०० वरून १२०० रुपये झाला. पेट्रोल डिझेलचे भाव ६०% वरून १२० झाले आहेत. रस्त्यावर उतरून मोदी सरकारला याबाबत जाब विचारायला हवा.
आमदार शेळके म्हणाले, “राज्य सरकारने वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीकडे लक्ष दिले पाहिजे. मावळातील वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. हे सरकार फक्त ४० आमदारांना सांभाळण्यासाठीच सुरू आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी महागाई व बेरोजगारी वर सरकारला जाब विचारला. वेदांत फाॅक्सकाॅन सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प मावळातून गुजरातला पळवला या विषयी खेद व्यक्त केला.

error: Content is protected !!