कार्ला:
देवले ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदी जयश्री रोहीदास गाडे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वंदना बाळासाहेब आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
उपसरपंच पदासाठी गाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संताजी जाधव यांनी गाडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी भाजे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर,माजी पोलीस पाटील कान्हू आंबेकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष अनिल आंबेकर,ग्रामपंचायत सदस्य सोनाली गायकवाड,विकास दळवी,मारुती दळवी उपाध्यक्ष धरणग्रस्त समिती,उद्योजक दगडू गाडे उपस्थित होते.

error: Content is protected !!