तळेगाव दाभाडे:
पिरसाहेब महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रियंका रुपेश घोजगे यांच्या पुढाकारातून मंगरूळ येथील ग्रामस्थांसाठी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे व अलिबाग दर्शनासाठी मोफत वाहनांची सुविधा करून देण्यात आली .
समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या घोजगे घराण्याच्या सूनबाई असणा-या प्रियंका रुपेश घोजगे या महिला बचत गटाच्या माध्यमातुन सदैव अनेक उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणा साठी प्रयत्नशील असतात.
गावांतील तरूण पिढीला सहली सोबत चवदार तळाच्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रदीप गायकवाड ,आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रुपेश घोजगे ,संतोष देशमुख ,कैलास चव्हाण ,पांडुरंग चव्हाण ,सोसायटी संचालक वरसु चव्हाण ,दिनकर चव्हाण ,मा ग्रां पं सदस्य नामदेव जुगदार,राहुल चव्हाण ,संपादक कुमार चव्हाण ,बाळासाहेब चव्हाण ,ज्ञानेश्वर चव्हाण ,चिंतामणी चव्हाण,नितीन चव्हाण,नवनाथ चव्हाण ,अमित चव्हाण ,मनोज चव्हाण,सुदर्शन चव्हाण , वैभव चव्हाण,अक्षय चव्हाण ,रवींद्र चव्हाण,मास्तर यशवंत चव्हाण ,सचिन चव्हाण ,पोपट जुगदार ,संदेश गायकवाड ,उमेश चव्हाण ,प्रकाश चव्हाण,किरण जुगदार ,आकाश चव्हाण ,संतोष चव्हाण ,समिर सोनवणे ,महेंद्र मापारी, निशांत चव्हाण ,या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते
सहकारी सोसायटी चे संचालक  वरसु चव्हाण व उदयोजक  प्रदीप गायकवाड म्हणाले,”  समाजहितासाठी नेहमीच तत्पर असणारे चेअरमन रुपेश घोजगे व  प्रियंका घोजगे यांच्या पाठीशी यापुढील काळातही खंबीरपणे ऊभे राहू.

You missed

error: Content is protected !!