वडगाव मावळ :
मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या मुख्य कार्यालयात प्रतिमा पूजन करून पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान पत्रकार दिनानिमित्त विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार बांधवांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष भारत काळे, जेष्ठ पत्रकार सुदेश गिरमे, गणेश विनोदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर वडगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, माजी उपसभापती प्रविण चव्हाण, भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे, माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे, रविंद्र म्हाळसकर यांनी तर वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवराज ग्रुपच्या वतीने अध्यक्ष अतुल वायकर, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, गणेश ढोरे, मोहित कदम, नवलाख उंबरेचे माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी पत्रकारांचा सन्मान केला.
गुलाबकाका म्हाळसकर, प्रविण चव्हाण, अनंता कुडे, प्रविण ढोरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना, पत्रकारांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते परंतु मावळ तालुक्यातील विकासात पत्रकारांचे योगदान मोठं आहे मावळ तालुक्यातील पत्रकार निःपक्ष पणे आपली भूमिका बजावत असतो व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन कायम तत्पर असतात पत्रकार क्षेत्रात काम करत असताना कायम पत्रकारांच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय सुराणा, सुदेश गिरमे, गणेश विनोदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष भारत काळे, सचिव किशोर ढोरे, उपाध्यक्ष सचिन शिंदे, संकेत जगताप, खजिनदार सचिन ठाकर, पत्रकार परिषद प्रमुख केदार शिरसाट, प्रसिद्धी प्रमुख निलेश ठाकर, दिनेश टाकवे, सुभाष भोते,प्रसाद कुटे, चेतन वाघमारे,अनिल घारे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भारत काळे यांनी केले तर आभार संघाचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी मानले.

error: Content is protected !!