निगडे:
निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश मारुती भांगरे निवडून आले. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा एक मताधिक्य मिळवून भांगरे निवडून आले.
लोकनियुक्त सरपंच  भिकाजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये  गणेश मारुती भांगरे आणि चंद्रकांत करपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
या लढतीत  गणेश मारुती भांगरे निवडून आले.
यावेळी निरीक्षक केदारी साहेब , तलाठी चव्हाण साहेब, ग्रामसेवक शशिकिरण जाधव  यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. ग्रा पं सदस्य, भगवान ठाकर, मंगल भागवत, भागाबाई ठाकर, सदिप चव्हाण, रोशनी साळवे, राजश्री खेंगले, मनीषा लोटे उपस्थित होते.
उपसरपंच पदाची निवड जाहीर होताच भांगरे समर्थक कार्यकर्त्याना भंडारा गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.नवनिर्वाचित उपसरपंच गणेश भांगरे यांचा सत्कार करण्यात आला 
यावेळी माजी सरपंच सविता भांगरे , माजी चेअरमन भगवान भांगरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित   गणेश भांगरे म्हणाले,” गावच्या सर्वागीण विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन कटीबध्द राहणार असून अधिक अधिक विकास कामे खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

error: Content is protected !!