वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी डॉ. प्रवीण निकम
वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी डॉ. प्रविण निकम यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून वडगाव नगरपंचायतीला मुख्याधिकारी पद रिक्त होते. तळेगावचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता.
वडगाव नगरपंचायतचे.नगराध्यक्ष मयुर ढोरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निकम हे यापूर्वी अकोले नगरपंचायतीत कार्यरत होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात द्वितीय, तर नाशिक महसूल विभागात प्रथम क्रमांक त्यांच्या कामकाजात मिळाला होता.
त्यांच्या कार्यकाळात मैला व्यवस्थापन बनवणारी ही पहिली नगरपंचायत ठरली होती. तसेच त्रिबंकेशर नगर परिषदेत एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. वडगाव नगरपंचायत हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन, विकास आराखडा, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन काम केले जाईल, असे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी सांगितले.

You missed

error: Content is protected !!