दारूंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अर्चना ईश्वर वाघोले बिनविरोध
सोमाटणे:
दारूब्रे ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी अर्चनाताई ईश्वर वाघोले यांची निवड करण्यात आली. सुवर्णा भालेकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. सरपंच उमेश आगळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणुकी साठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच पदासाठी वाघोले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.
ग्रामसेवक संभाजी दंतराव यांच्या उपस्थितीत हि प्रक्रिया पार पडली. अर्चनाताई वाघोले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश  वाघोले, माजी उपसरपंच संदीप सोरटे, अनिल वाघोले, माया वाघोले, विशाखा वाघोले, मोनिका वाघोले, जनसेवक दिलीप राक्षे, सरपंच राकेश मुहें, राहुल येवले, संदीप गराडे, संचालक सुरेश वाघोले, उपसरपंच शांताराम वाघोले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुर्यकांत वाघोले, माजी सरपंच सोमनाथ वाघोले, कार्यसम्राट सरपंच राजेश वाघोले, मावळ केसरी राकेश सोरटे, माजी उपसरपंच विजय वाघोले, गणेश वाघोले, माजी सरपंच कैलास वाघोले,जनार्दन वाघोले,बाळासाहेब सावंत, लक्ष्मण  शितोळे (पोलीस पाटील), गुलाबराव वाघोले उपाध्यक्ष जयहिंद बॅक उपाध्यक्षमा  सरपंच तानाजी वाघोले मा उपसरपंच पप्पु वाघोले मा उपसरपंच पै गणेश वाघोले, यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यसम्राट सरपंच राजेश वाघोले, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित उपसरपंच अर्चना वाघोले म्हणाल्या,”गावच्या सर्वागीण विकासासाठी सर्व जेष्ठ मान्यवर , सरपंच,आजी माजी लोकप्रतिनिधी  सदस्यांना सोबत घेवून काम करणार आहे.

error: Content is protected !!