पवनानगर :
मागील काही महिन्यांपूर्वी गोधाम इको व्हीलेज चे अध्यक्ष नितीन घोटकुले यांनी वाढदिवसानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान यांना तुंग किल्ला संवर्धनासाठी एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली होती.या देणगीतून सह्याद्री प्रतिष्ठान यांनी तुंग किल्यावर रोपवे बसवण्यात आले.
या रोपवेचे उद्घाटन नितीन घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी घोटकुले बोलले की दर वर्षी मी माझ्या वाढदवसानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान यांना किल्ले संवर्धनासाठी एक लाख रुपये देत राहणार आहे.तसेच इतर नागरिकांनी देखील अनावश्यक खर्च टाळून केल्ले संवर्धनासाठी एक पाऊल पुढे येऊन मदत करत राहावे असे आव्हान देखील नागरिकांना केले.
हा रोपवे तुंग किल्याची डागडुजी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून याची लांबी ३५० मीटर असून याची ३०० किलो वजन घेऊन जाण्याची शमता आहे असे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे यांनी सांगितले तसेच त्यांनी या वेळी घोटकुले यांचे आभार मानले. 
तसेच इतिहासकार प्रमोद बोराडे यांनी या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना तुंग किल्ल्याचा प्राचीन इतिहास,मध्येयुग इतिहास,याची माहिती सांगितली तसेच तरुण पिढी ने लिहित व्हावे असे तरुण पिढीला अहवान केले व घोटकुले यांचे आभार मानले. 
या वेळी आणेक नागरिकांनी किल्ले संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान यांच्याकडे देणगी देण्यात आली.
या वेळी धनंजय टिळे,संदीप घोटकुले,ज्ञानेश्वर ठाकर, रवींद्र मोहोळ, संदीप जाधव, गणेश शिंदे, अनिकेत गाडे, आप्पा गायकवाड, अमोल तिकोने, बाळासाहेब जमादार, अनिल घोटकुले, सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व तुंग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!