पुणे:
नव वर्षाच्या  सुरुवातीस आंदर मावळातील धनगर बांधवाना मायेची उब मिळाली. टेलस  ऑर्गनायझेशन व चिन्मय प्रतिष्ठानच्या लोकेश बापट व डॉक्टर राधा मुकुंद संगमनेरकर यांच्या मदतीने हा उपक्रम झाला.
  बोरवली पठार, काब्रे  पठार येथील दुर्गम भागातील धनगर समाजातील शंभर जणांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. मावळ भागातील डोंगर पठारावर अनेक ठिकाणी धनगर  समाजाची कुटुंबे राहत आहेत.
  अनेक सुविधांपासून वंचित असणाऱ्या वाड्या वस्ती मध्ये  हे कुटुंब राहत आहेत. टेलस ऑर्गानायझेशन आणि  चिन्मय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला गेला. दोन्ही संस्था अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यातील अशा प्रकारच्या वंचित समाजास वेगवेगळ्या सामाजिक माध्यमातून कामे करून मदत करत आहे.
  या प्रसंगी  ज्येष्ठ लेखक व प्राचार्य श्री श्याम भुरके व डॉ. मुकुंद संगमनेरकर  यांच्या हस्ते ब्लँकेटचे  वाटप  करण्यात आले .या वेळी डॉक्टर राधा संगमनेरकर , गीता भुरके , ऋचा सावरकर   टेलस  संस्थेचे जान्हवी  बापट हेरंब  पाटणकर, किमया बापट तसेच गावचे सरपंच श्री नामदेव शेलार ,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब  ठिकडे,  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग ठिकडे,गंगाराम हिरवे,लक्ष्मण हिरवे व  ग्रामस्थ उपस्थित होते.
  मावळ सत्य लाईव्ह बुलेटीनचे संपादक रामदास वाडेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

error: Content is protected !!