पिंपरी:
थर्टी फर्स्टला ‘दारू नको दुध प्या ‘ स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचा हा स्तुत्य उपक्रम नववर्षाच्या पूर्वेला झाला . इंग्रजी नववर्षाचे स्वागत दारु पिऊन जोरदार पार्टी साजरी करत करण्याची प्रथा समाजात रुजली आहे.त्यावर हे झणझणीत अंजन स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने घातले.
सर्वच स्तरातील लोक अशा पद्धतीने पार्टी साजरी करतात, त्याला छेद देत दारू नको दुध प्या ही कन्सेप्ट राबवली जात आहे. स्माइल व्यसनमुक्ती केंद्राने नववर्षाचे स्वागत दारु पिऊन न करता दुध पिऊन करण्याचा संदेश दिला. ‘दारु नको दुध प्या’ असा नारा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना मोफत दुध वाटप करण्यात आले.
पीएमपीएमएल बस स्थानक, चिंचवडगाव येथे आज (शनिवार, दि. 31 ) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, नगरसेवक सुरेश भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णकांत खराडे,स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पंडित, प्रणव देशमुख, हर्षल जोशी, प्रकाश धिडे, आनंद भागवतजयंत खेर्डेकर, ओंकार देशपांडे, दुर्गा दरजी, रोहन यादव, सुभाष पंडित, वैशाली पंडित, श्रावस्ती पंडित,सागर आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्माइल व्यसनमुक्ती केंद्र, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ढमाले डेअरी व मोरया शिक्षण संस्था, टेकन्विस कंपनी यांच्या संयुक्त विद्यामाने हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लिंक रोड ते पीएमपीएल बस स्टॉप, चिंचवडगाव येथपर्यंत घोषणा रॅली काढण्यात आली.
‘मघपान म्हणजे मनोविकार’, ‘मघ करते बुद्धी भ्रष्ट, त्यापेक्षा दुध श्रेष्ठ,’ अशा घोषणा देण्यात आल्या. नववर्ष स्वागताला मघापासून नागरिकांना वंचित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यामध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी ‘दास्ने झिंगला, संसार भंगला’, ‘दारूची बाटली फुटलीच पाहिजे’, एक सकारात्मक संदेश समाजात घावा तसेच लोकांना दास्मासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने आम्ही ‘दारू नको दुध प्या’ हा उपक्रम हाती घेतला. यावेळी नागरिकांना सांताक्लॉज व महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील
स्माइल व्यसनमुक्ती केंद्राचे हर्षल पंडित म्हणाले, ‘नववर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याची एक चुकीचा आणि आरोग्यास घातक सवय समाजात वाढली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना
स्माइल व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यकत्यांच्या हस्ते दुध वाटप करण्यात आले. लोकांना व्यसनापासून दूर राहून नववर्षाचे स्वागत करावे यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.’

You missed

error: Content is protected !!