मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे  प्रकाशन
वडगाव मावळ :
मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस महाराज) यांच्या हस्ते करण्यात आले.
कान्हे फाटा येथील साईबाबा सेवाधाममध्ये डॉ. स्वाती वेदक, माजी उपसरपंच एकनाथ शेटे, माजी सभापती सुवर्णा कुंभार, ह.भ.प. शिवाजी पवार, वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, भरत येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
  मंडळाच्या वतीने सुमारे ५ हजार दिनदर्शिका छापण्यात आल्या असून, येत्या काही दिवसांत त्यांचे संपूर्ण मावळ तालुक्यात वितरण करण्यात येणार असल्याचे नंदकुमार भसे यांनी सांगितले.
  मंडळाचे पदाधिकारी बजरंग घारे, नितीन आडिवळे, सागर शेटे, दीपक वारिंगे, शांताराम गायखे, नीलेश शेटे, सुखदेव गवारी, सुनील महाराज वरघडे, महादूबुवा नवघणे, लक्ष्मण ठाकर, सुभाष महाराज पडवळ, बळवंत येवले, पंढरीनाथ वायकर, गोविंद सावले, शांताराम लोहर आदींनी विशेष प्रयत्न केले. प्रास्ताविक रामदास पडवळ यांनी केले, सूत्रसंचालन दिलीप वावरे यांनी केले, तर संतोष कुंभार यांनी आभार मानले.

error: Content is protected !!