चिखलसे, अहिरवडे, कुसगाव खु. नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध
वडगाव मावळ :
  मावळ तालुक्यातील चिखलसे, अहिरवडे, कुसगाव खु.येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी (दि.२७) महिलांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न झाला.
आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांसाठी एकुण २ कोटी ७० लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.या निधीतून अहिरवडे व कुसगाव येथे पाण्याची टाकी होणार होणार असून पाणी वितरणासाठी सुमारे १५ किलोमीटर लांबीची पाईपलाईन करण्यात येणार आहे.पुढील पाच महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या भुमिपूजन समारंभास माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्ष सारिका शेळके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष पुष्पा घोजगे,ओबीसी सेल अध्यक्ष संध्या थोरात, सरपंच सुलभा भोते, सविता बधाले, सरपंच सुनीता सुतार, कुसगाव उपसरपंच दिपाली लालगुडे, सदस्य कल्याणी काजळे, सविता सांगळे, मनिषा लालगुडे, पूनम आल्हाट, श्रुती मोहिते, वर्षा नवघणे, मनीषा लालगुडे, शशिकला सातकर, मनीषा भसे, सुवर्णा घोलप, अनिता मोहोळ, मीनाक्षी वाळुंज, शिल्पा चौधरी, अर्चना काजळे, सरपंच पप्पु येवले, सदस्य सुनिल काजळे, बाळासाहेब काजळे, बळवंत काजळे, संदीप काजळे, विजय काजळे, बंटी लालगुडे, तानाजी दाभाडे, गजानन शिंदे, निलेश दाभाडे, आदि. मान्यवर, पदाधिकारी, महिला-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी गावातील नागरिकांनी  रस्त्यांवर रांगोळ्या काढून तसेच ढोल लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून मान्यवरांचे भव्य स्वागत केले.
नव्याने होणार असलेल्या या नळ पाणी पुरवठा योजनेमुळे चिखलसे, अहिरवडे व कुसगाव खुर्द या तिन्ही गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने येथील नागरिकांनी भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार सुनिल शेळके यांचे विशेष आभार मानले.

You missed

error: Content is protected !!